जिल्ह्यात आणखीन १३१ जण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आणखीन १३१ जण पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*जिल्ह्यात आणखीन १३१ जण पॉझिटिव्ह*

*कोरोनामुळे ८जणांचा मृत्यू;डॉ.श्रीपाद पाटील

*सिंधुदुर्गनगरी ता.२३:*

जिल्ह्यात आज दुपारी १२:०० वाजेपर्यंत एकूण ७ हजार ७९९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर जिल्ह्यात आज ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी १३१ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

मृतांमध्ये शिवडाव-कणकवली येथील ६३ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. बांधकरवाडी-कणकवली येथील ७९ वर्षीय महिल आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. शिवडाव-कणकवली येथील ६८ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्दाब, मधुमेहाचा त्रास होता. किंजवडे-देवगड येथील ६४ वर्षीय पुरुष आहे. त्याला किडनी विकाराचा त्रास होता. कांबळेगल्ली-कणकवली येथील ४९ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. साटेली-दोडामार्ग येथील २८ वर्षीय पुरुष आहे. त्याला रक्तविकाराचा त्रास होता. जामसंडे-देवगड येथील ५७ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. निरवडे-सावंतवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!