कणकवलीत ‘संताजी जगनाडे चषक 2026’ ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा….!

कणकवलीत ‘संताजी जगनाडे चषक 2026’ ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा….!

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत ‘संताजी जगनाडे चषक 2026’ ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा….!*

*युवा तेली समाज मंडळ, सिंधुदुर्ग यांचे आयोजन….!*

*21 व 22 मार्च रोजी कणकवली कॉलेज पटांगणावर रंगणार क्रिकेटचा महासंग्राम…!*

*कणकवली – सौ.संजना हळदिवे*

युवा तेली समाज मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘संताजी जगनाडे चषक 2026’ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. 21 मार्च ते रविवार दि. 22 मार्च 2026 या कालावधीत कणकवली कॉलेजच्या पटांगणावर रंगणार आहे.
या विजेत्या संघाला 20,026 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या संघाला 10,026 रुपये व आकर्षक चषक, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला 5,026 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
तसेच स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट यष्टीरक्षक यांना स्मार्टवॉच व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. मालिकावीर खेळाडूस सायकल व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू तेली समाजातील असणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी महेश डिचोलकर (अध्यक्ष) 7387362202, विशाल नेरकर (सचिव) 9403228842, चेतन फोंडेकर 9765018365 व विठ्ठल पेडणेकर 8623902428 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!