लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व ग्रामपंचायत परबवाडा वेंगुर्ला ह्यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व ग्रामपंचायत परबवाडा वेंगुर्ला ह्यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व ग्रामपंचायत परबवाडा वेंगुर्ला ह्यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन*

* वेंगुर्ला ; प्रतिनिधी*

१० मार्च २०२६ रोजी लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व ग्रामपंचायत परबवाडा वेंगुर्ला ह्यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्री विष्णू उर्फ पप्पू चंद्रकांत परब, ग्रामपंचायत सरपंच शमिका बांदेकर,ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, स्वरा देसाई, सुहिता हळदणकर,कार्तिकी पवार, परबवाडा शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र झोरे सर व लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चे डॉ पूजा राजन कर्पे, डॉ सतीश पाटील,आरोग्य अधिकारी डॉ मेहतर,परिचारिका सावंत, वैद्यकीय चाचणी तज्ज्ञ कार्डोज आणि सोबत महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
गावातील युवावर्ग,स्त्रीशक्ती, पुरुषवर्ग व वयस्कर ग्रामस्थांनी मोफत आरोग्य शिबिर व रक्त तपासणीचा लाभ घेतला.
ह्यावेळी श्री विष्णू उर्फ पप्पू परब ह्यांनी होमिओपॅथी चे कौतुक केले व आरोग्य शिबिराचे स्वागत केले,महाविद्यालयाच्या डॉ पूजा कर्पे मॅडम ह्यांनी आरोग्य शिबिराचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाविद्यालयाचे विद्यार्थी विनीत महेंद्र परब ह्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!