वेंगुर्ला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आमचा प्रयत्न..

वेंगुर्ला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आमचा प्रयत्न..

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आमचा प्रयत्न…*

*मनीष दळवी; नूतन सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांचे केले अभिनंदन…*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

” वेंगुर्ले तालुक्याला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महायुती म्हणून या तालुक्यातील विकासाची संपूर्ण जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली असून, विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

वेंगुर्ले पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींना शुभेच्छा देताना ते बोलत होते. वेंगुर्ले पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी महायुतीला शंभर टक्के बहुमत दिले आहे. या विजयानंतर महायुतीमधील विजयी उमेदवारांपैकी शंकर घारे यांची सभापतीपदी, तर सचिन देसाई यांची उपसभापतीपदी आज अधिकृत निवड करण्यात आली. या निवडीनंतर श्री. दळवी यांनी दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि निवड प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना दळवी पुढे म्हणाले की, “यापुढे तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्या आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमचे सर्व सदस्य थेट गावागावात जातील. लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यावर आमचा भर असेल.” तसेच, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजपा तालुका अध्यक्ष पप्पू परब, गटनेते आपी फणसेकर, सदस्य संकेत धुरी, नितीन चव्हाण, तसेच कमलेश गावडे, वसंत तांडेल, राजबा सावंत यांच्यासह महायुतीचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!