*कोकण Express*
*कणकवली मतदारसंघांसाठी शंभर मिनी ऑक्सिजन सिलेंडर तर 25 बेड आज देवगड येथील कोविड केअर सेंटरसाठी*
*आ.नितेश राणेंचा पुढाकार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आमदार नितेश राणे यांनी शंभर मिनी ऑक्सिजनचे सिलेंडर कणकवली मतदार संघासाठी उपलब्ध करून दिले आहेत. हे ऑक्सिजनचे सिलेंडर कोणत्याही तज्ञा शिवाय माणसाला वापरता येतात एखाद्या स्प्रे साठी वापरतात तेवढा सिलेंडर यासाठी वापरात आणला आहे. यामुळे माणसाचा जीव वाचतो.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला ऑक्सिजन मिळत नाही. यावेळी प्रथमोपचारासाठी या सिलेंडर चा उपयोग करता येतो. पुढील वैद्यकीय मदत मिळेपर्यंत या सिलेंडरच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णाला होऊ शकतो व रुग्णाचा जीव वाचतो.
आमदार नितेश राणे यांनी देवगडसाठी ही बेड पाठवले असून यातील 25 बेड आज देवगड येथील कोविड केअर सेंटर मध्ये पोहोचले. देवगड येथील शेठ म ग हायस्कूल येथिल कोविड सेंटर मध्ये यातील 25 बेड देण्यात आले आहेत. यामुळे कणकवली मतदार संघामध्ये प्राथमिक अवस्थेत सुमारे 75 बेड कोरोना ग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी ही सुविधा निर्माण केल्याने आरोग्य यंत्रणेला रुग्णाला वाचवण्यात यश येईल.