सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदी सुश्मिता जाधव यांची बिनविरोध निवड; कार्यकर्त्यांचा जल्लोष

सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदी सुश्मिता जाधव यांची बिनविरोध निवड; कार्यकर्त्यांचा जल्लोष

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदी सुश्मिता जाधव यांची बिनविरोध निवड; कार्यकर्त्यांचा जल्लोष*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या विशेष निवडीत सुश्मिता जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सावंतवाडी तालुक्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला.
निवड जाहीर होताच पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी यांनी नवनिर्वाचित सभापती सुश्मिता जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत गजानन नाटेकर, राजन रेडकर, शंकर नाईक, गुंडू जाधव, विश्वास घाग, एकनाथ हळदणकर यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अशोक दळवी यांनी सांगितले की, सुश्मिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल. सुश्मिता जाधव यांनी आपल्या निवडीबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले असून, सर्वांना सोबत घेऊन जनहिताची कामे करण्याला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.
या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सुश्मिता जाधव यांचे जंगी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!