सावंतवाडी,वेंगुर्ले व दोडामार्ग या तीनही तालुक्यात प्रत्येकी तीन शेव वाहिन्या आणि तीन ॲम्बुलन्स देणार ; आमदार दीपक केसरकर

सावंतवाडी,वेंगुर्ले व दोडामार्ग या तीनही तालुक्यात प्रत्येकी तीन शेव वाहिन्या आणि तीन ॲम्बुलन्स देणार ; आमदार दीपक केसरकर

*कोकण Express*

*सावंतवाडी,वेंगुर्ले व दोडामार्ग या तीनही तालुक्यात प्रत्येकी तीन शेव वाहिन्या आणि तीन ॲम्बुलन्स देणार ; आमदार दीपक केसरकर*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी वेंगुर्ले व दोडामार्ग या तीनही तालुक्यात प्रत्येकी तीन शेव वाहिन्या आणि तीन ॲम्बुलन्स सह कार्डिओ ॲम्बुलन्स देण्याबरोबर पीपीई किट, मास्क हॅन्ड ग्लोज व इतर आवश्यक सुरक्षतेच्या बाबी आपण आमदार विकास निधीतून उपलब्ध करून देण्याची ग्वाही माजी गृह वित्त व नियोजन राज्यमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी दिली.ते आज झालेल्या ऑनलाइन झूम ॲपवरील मीटिंगद्वारे बोलत होते या मीटिंगमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

एका लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने कोरोना प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शहरात २ ठिकाणी लसीकरणाची केंद्रे निश्चित करावी तसेच शहरातील वॉर्ड निहाय आणि ग्रामीण भागात गाव निहाय नागरिकांना टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात यावे. अशी सूचना

या ऑनलाईन मीटिंगमध्ये प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खालीपे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिवसेना प्रवक्ते नगरसेवक जयेंद्र परुळेकर व इतर अधिकारी जॉईन झाले होते.

यावेळी केसरकर यांनी तालुक्यात लसीकरणासाठी एकाच ठिकाणी केंद्र असल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास इतरांना धोका होण्याचा मोठी शक्यता असते. याचा विचार करून तालुक्यात येथील उपजिल्हा रुग्णालयासह अन्य एका ठिकाणी कोविशील्ड लसीकरण वितरण केंद्र तयार करावे, ही कार्यवाही करताना दुसरे केंद्र सुरुवातीस बॅ. नाथ पै हॉलमध्ये ठेवण्याची कल्पना या वेळी देण्यात आली ;मात्र जयंत जावडेकर यांनी या हॉलमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्याची कल्पना देताच केसरकर यांनी आयुर्वेद कॉलेजचा पर्याय समोर ठेवला. याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी कॉलेजच्या प्रमुखांशी संपर्क साधून पुढील निर्णय घ्यावा अशी सूचना केली. नसल्यास अन्य ठिकाण योग्य जागा पाहुन उपलब्ध करावे.

लसीकरणासाठी २ केंद्र निर्माण झाल्यानंतर शहरातील नागरिकांचे लसीकरण करताना त्यांना वार्ड निहाय लसीकरण करण्यात यावे, तसेच ग्रामीण भागातील नागरिकही शहराकडे धाव घेतात. त्यामुळे गर्दी होऊ शकते अशा वेळी ग्रामीण भागातही प्रादुर्भाव होऊ शकतो. याचा विचार करून ज्या ठिकाणी मोठी लोकसंख्या आहे, अशा एका गावातील नागरिकांची आणि ज्या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्या आहे अशा दोन किंवा तीन गावांचे एकत्रित लोकसंख्या पकडून प्रत्येक गावांना एक दिवस ठरवून तेथील नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे अशी सूचना यावेळी दिली. ग्रामीण भागातील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोनाच्या साधनसामुग्री बाबत काही समस्या जाणवत असल्यास त्या विचारून त्यांना आवश्यक त्या बाबी उपलब्ध करा अशा सूचना वर्षा शिरोडकर यांना देण्यात आल्या.

यावेळी डॉ परुळेकर यांनी सुरक्षेसाठी खूप फायदेशीर असलेल्या ए ९५ मास वाटप करण्यासंदर्भात कल्पना मांडली. ती मान्य करत केसरकर यांनी शहरी भागात मार्केट 4 तास उघडी असतात. त्यामुळे नागरिकांची परवड होते याचा विचार करून दिवसभरात होम डिलिव्हरीची सोय करण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याशी निर्णय घेण्याबाबत चर्चा करू. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी एक ॲम्बुलन्स आणि एक वाहिनी उपलब्ध करून देण्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. शिवाय ग्रामीण भागातील नागरिक ज्या वेळी लसीकरणासाठी शहरात येतील त्यावेळी त्या गावात नागरिकांसाठी ये जा करण्यासाठी एसटी ची सोय उपलब्ध करून देण्याबाबत प्रांत अधिकारी सुशांत खांडेकर यांना आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याबाबत सुचित केले. यावेळी डॉ परुळेकर यांनी गतवर्षी पहिल्या करून रात्रीच्या वेळी ग्राम दक्षता समित्यांनी वाखाणण्याजोगे काम केले होते; मात्र करून आता दुसऱ्या लाटेवेळी यात पहिल्यासारखी उत्सुकता दिसून येत नाही, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी केली. केसरकर यांनी याकरिता आवश्यक अधिकाऱ्यांचा सह गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांची ऑनलाइन बैठक घेण्यात यावी या बैठकीत आपण स्वतः उपस्थित राहू असल्याची कल्पना यावेळी दिली. तिन्ही तालुक्याच्या बैठका ऑफलाईन किंवा ऑनलाइन तांत्रिक बाबी पाहून घेण्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी अत्यावश्यक सेवेत मॉडेल असलेली दुकाने तसेच वाहतुकीसाठी परवाना असलेले रिक्षा सॅनिताईझ करण्याची सूचना करून लसीकरण किंवा रॅपिड टेस्ट केल्यावर सर्व टाकाऊ वैद्यकीय कचरा योग्य नीट सर्वांपासून दूर काळजीपूर्वक ठेवण्यात यावा. यासाठी पिवळ्या रंगाचे बिन निधी मधून उपलब्ध करून देण्यात येतील. 45 वर्षावरील नागरिकांना फेस शील्ड मास द्यावा. सर्व आवश्यक त्या बाबींसाठी आपण जास्तीत जास्त निधी देन्याची ग्वाही दिली. बैठकीच्या अखेरीस सर्व सूचनांचा वाचनीय आढावा प्रांताधिकारी सूशांत खांडेकर यांनी घेऊन आवश्यक त्या सूचना आदेश संबंधित अधिकाऱ्यांना कळवून कार्यवाही करू असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!