फोंडा नं. १ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न; पाककला व वेशभूषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद

फोंडा नं. १ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न; पाककला व वेशभूषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडा नं. १ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न; पाककला व वेशभूषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद*

*फोंडा नं. १ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात; रूपा सापळे पाककला स्पर्धेत प्रथम*

*फोंडाघाट : संजना हळदिवे*

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवन शिक्षण विद्यामंदिर, फोंडा नं. १ येथे विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “काळानुरूप महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रेया नानचे यांनी यावेळी केले.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. या स्पर्धेसाठी ‘नाचणीपासून खाद्यपदार्थ तयार करणे’ हा विषय देण्यात आला होता. परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत नाचणीपासून बनवलेले विविध पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ सादर करून आपल्या कल्पकतेची मोहोर उमटवली.
पाककला स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे:
* प्रथम क्रमांक: रूपा निलेश सापळे
* द्वितीय क्रमांक: स्वप्नाली समाधान वाघमोडे
* तृतीय क्रमांक: सुप्रिया गजानन सावंत
* उत्तेजनार्थ: विजया लकुळ गोसावी व मृण्मयी दत्तात्रय रेवडेकर
या स्पर्धेचे परीक्षण अंगणवाडी सेविका प्रियांका रेवडेकर व वर्षा वायंगणकर यांनी केले.
पाककला स्पर्धेसोबतच शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. सहभागी चिमुकल्यांना भेटवस्तू आणि खाऊ देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रेया नानचे, उपशिक्षिका वेदांती नारकर, रंजना पाटील आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!