*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक महिला दिवस साजरा*
*वेंगुर्ले: प्रतिनिधी*
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला हा दिवस साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर. के. जी. केळकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना अनाधिकालापासून वंदनीय असणाऱ्या स्त्रीशक्तीला कर्तुत्व सिद्ध करत असताना संघर्षाला सामोरे जात त्याची क्षमता दाखवण्याजोगी आहे हे विशद केले ,तर प्रमुख वक्ता डॉक्टर. सौ. पूजा करपे यांनी जागतिक महिला दिवस सुरुवात ते यावर्षीच्या घोषवाक्य पर्यंतच मागोवा घेतला, गतवर्षी जागरूकतेकडून मूर्त बदलाकडे जाताना स्त्रियांच्या समस्या बोलत्या झाल्या ,परिस्थितीजन्य प्रश्न सोडवले जाऊ लागले, सहभागाचे स्वरूप बदलत गेले शिक्षण ,संस्कृती ,समाजकारण, राजकारण, अर्थव्यवस्था मध्ये महिलांचा ठसा उमटत आहे. यावर्षीच्या घोषवाक्यानुसार “गिव्ह टू गेम” लिंग समानेवरील अर्थपूर्ण प्रगतीसाठी सरकार, संस्था ,व्यक्ती चे जाणीवपूर्वक योगदान आवश्यक असून त्यातूनच महिला सुरक्षित रित्या हक्क ,नेतृत्व यामध्ये गुंतवणूक करून समाजाला बळकट करतात.” गिव्ह टू गेन” ही मोहीम उदारता सहकार्य याला प्रोत्साहित करते सहजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांच्या कामगिरीची ओळख होते, समाज त्याचा सन्मान करतो. आर्थिक कौशल्यातून महिला समाज संघटन करून उन्नतीच्या वाटेवर मार्गक्रमण करताना स्वतःचा आरोग्याचे भान राखत सामाजिक आरोग्य ही कुटुंबासहित विकसित करत आहेत विकसित भारताची विकसित महिला योगदान देत असल्याचे नमूद होते.यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केजी केळकर उपप्राचार्य डॉक्टर आरोसकर, डॉक्टर सावंत, डॉक्टर माधव, डॉक्टर हिरलेकर, डॉक्टर सिद्धी सावंत, डॉक्टर मुळे ,डॉक्टर देसाई ,डॉक्टर माळी, सौ गोलतकर, डॉक्टर मराठे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रतीक कांबळे, स्वागत विनीत परब, आभार अंकिता ओहोळ यांनी केले.प्रथम वर्ष ते चतुर्थ वर्ष विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

