*कोंकण एक्सप्रेस*
*१४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम*
*सिधुदुर्गनगरी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी राबविण्यात येत आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी या मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त १४वर्षावरील मुलींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे
या मोहीमेचादिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभकरण्यात आला आहे. महाराष्ट्रात ८ मार्च २०२६ रोजी ‘महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात येत असून सदरची मोहीम माननीय पालकमंत्री सिंधुदुर्ग, श्री नितेशजी राणे व. जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय नियोजन व अंमलबजावणी होत आहेकेंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (Human Papillomavirus HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची (Steering Committee) बैठक ०५ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुधीर धनगे हे उपस्थित होते.
मोहिमेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टः गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर ही मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही मोहीम एकूण ९० दिवस (तीन महिने) चालणार आहे.
मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्येःपात्र लाभार्थीः ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि ज्यांना १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत, अशा सर्व मुली या लसीकरणासाठी पात्र असतील.
लस आणि मात्राः या मोहिमेत ‘Gardasil-4’ (Quadrivalent HPV) ही लस दिली जाईल. लाभार्थ्याला या लसीचा फक्त एकच डोस (०.५ मि.ली.) डाव्या हाताच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिला जाणार आहे.
लसीकरण ठिकाणः ही लस केवळ शासकीय आरोग्य संस्थांमध्ये, जसे की आयुष्मान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र), ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असेल. लसीकरणाची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी २.०० अशी निश्चित करण्यात आली आहे.
नोंदणी प्रक्रियाः पालकांना आपल्या मुलींची नोंदणी ‘यू-विन’ (U-WIN) पोर्टलवर स्वतः करता येईल किंवा आरोग्य केंद्रावर जाऊन जागीच (Walk-in) नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या सूचनाः लसीकरण पूर्णपणे ऐच्छिकआहे. लसीकरणापूर्वी मुलींनी आहार घेतलेला असावा, याची खात्री पालकांनी करावी. ही लस अत्यंत सुरक्षित असून लसीकरणानंतर काही वेळ मुलींना आरोग्य केंद्रात निरीक्षणाखाली ठेवले जाईल. कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी शासनाने ‘१०४’ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पात्र मुर्तीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण करून त्यांना भविष्यातील कर्करोगाच्या धोक्यापासून सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

