परुळे येथे ८मार्च रोजी ‘जलमहोत्सवाचे ‘ आयोजन

परुळे येथे ८मार्च रोजी ‘जलमहोत्सवाचे ‘ आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*परुळे येथे ८मार्च रोजी ‘जलमहोत्सवाचे ‘ आयोजन*

*केद्रीय राज्यमंत्री, सचिव मान्यवरा ची उपस्थिती – रविद्र खेबुडकर*

*सिधुदुर्गनगरी*

ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात दि. ८ ते २२ मार्च पर्यत जलमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा शुभारंभ ग्रामपंचायत परुळेबाजार, महसुल गाव कर्ली, ता. वेंगुर्ला येथे . केंद्रीय राज्यमंत्री, पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय भारत सरकार श्री. व्ही. सोमान्ना,. सचिव, पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली, . श्री. अशोककुमार मिना, तसेच . सचालंक, पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली, . श्री. प्रदिप सिंग यांच्या उपस्थितीत दिनांक ८ मार्च २६ रोजी होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे
दि. ८ ते २२ मार्च २६ रोजी आयोजित जलमहोत्सव अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पाणी ही केवळ पायाभूत सुविधांची बाब राहिलेली नसुन ती सांस्कृतिक पद्धती म्हणुन पाण्याची जपणूक करण्यात येणार आहे. पाण्याच्या संवर्धाना साठी स्थानिक पंरपरा यांचा उपयोग विचारात घेण्यात येणार असुन गावागावात पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे ,फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे. प्रत्येक गावात युवकांचा जल सवर्धना साठी सहभाग घेणेसाठी यंग बिग्रेडची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धाचे आयोजन करणेत येणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या संवर्धानासाठी उपाययोजनांचा समावेश करणेत येणार आहे.
गाव, पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला जाईल. जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असणार आहे. पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमामागचा उद्देश आहे.
या कार्यक्रमांतर्गत गावागावात पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. आरोग्य आणि पाणी यांचा समन्वय राखला जाणार आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीवर भर देण्यासाठी कशुल मनुष्यबळ तयार केले जाणार आहे. जलमहोत्सवात गावात ग्रामसभा आणि पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाणार आहे. महिलांद्वारे फिल्ड टेस्टिंग किटद्वारे जल गुणवत्ता चाचणी घेतली जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या गावातील जलस्त्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जलस्त्रोतांचे पुनरूज्जीवन आणि स्वच्छता करणे, पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण आणि सामुदायिक शपथं घेणे, ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे. अशी माहिती मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!