जावया पाटोपाठ सासऱ्याने ही सोडला प्राण

जावया पाटोपाठ सासऱ्याने ही सोडला प्राण

*कोकण  Express*

*जावया पाटोपाठ सासऱ्याने ही सोडला प्राण..!*

*अवघ्या 12 तासांच्या फरकात घरातील दोघांचा मृत्यू…!*

*कांबळेगल्ली मधील हृदय हेलावणारी घटना….!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली कांबळे गल्ली मधील रहिवासी त्रिलोक दत्तात्रय सोळसकर ( वय 70 ) यांचे शुक्रवारी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वी जिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी त्यांचे जावई राजेश धुरी यांचे निधन झाले.याचा धक्का त्यांना सहन झाला नाही. यामुळे निधन झाल्याचे बोलले जातेय.जावई पाटोपाठ अवघ्या 12 तासांच्या फरकाने सासऱ्याचे निधन झाल्याने सोळसकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुःखद घटनेचे वृत्त कांबळे गल्ली परिसरात समजताच अनेकांचे डोळे पाणावले. त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर कणकवली स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आलेेेेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!