मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर

मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला येथील मुक्तांगण महिला मंचची बैठक मराठी भाषा दिनादिवशी संपन्न झाली. या बैठकीत 2026-27 या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर तर कार्याध्यक्षपदी नूतन परब यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-साक्षी परब, खजिनदार-रूपा शिरसाट, सचिव-दिव्या आजगांवकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख-स्वाती बांदेकर, मंजिरी केळजी, माहे·ारी गवंडे, सहल विभाग प्रमुख-अनुजा धारगळकर, निलम रेडकर, माधवी मातोंडकर, उपक्रम विभाग प्रमुख-संजना तेंडोलकर, दिपा वाडेकर तर सदस्य म्हणून गौरी माईणकर, रिया केरकर, आरती बांदवलकर यांचा समावेश आहे. या महिला मंचातर्फे विविध संस्थांना भेटी, शिबिरे, व्याख्याने आदी कार्यक्रम राबविले जाणार असून या उपक्रमांमध्ये मुक्तांगणच्या महिलांसोबतच इतरही महिलांना भाग घेता येणार आहे. तसेच ज्या महिलांना या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी मुक्तांगण महिला मंचाशी संपर्क साधावा असे आवाहन मुक्तांगणच्या प्रमुख मार्गदर्शक मंगल परूळेकर यांनी केले. या निवडीनंतर मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुक्तांगणच्या महिलांनी आठवणीतल्या कविता सादर केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!