*कोंकण एक्सप्रेस*
*शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडावच्या आठ विद्यार्थ्यांना ग्लोबल फौंउडेशनची ज्ञानज्योती शिष्यवृती प्रदान*
*शिवडाव ः प्रतिनिधी*
ग्लोबल फाऊंडेशन, पिंगुळी कुडाळ या सेवाभावी संस्थेमार्फत शिवडाव सेवा संघ मुंबई संचलित शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडावच्या आठ गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली या शिष्यवृत्ती द्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांस रु.३६००/- ऐवढी आर्थिक मदत करण्यात आली अंश सरंगले मानस राणे, गौरी सावंत, पूर्वा गांवकर, आदिती घाडीगांवकर, तेजस्वी परब, सुवर्णा पेंडूरकर, दिव्या सावंत या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक हातभार लाभला आहे. सदर शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रशालेचे शिक्षक श्री गणेश वर्षे, लिपिक श्री. राहुल वाळके यांनी मेहनत घेतली.
शिवडाव सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्री. मोहन पाताडे, कार्यवाह श्री. काशीराम गावकर व सर्व पदाधिकारी, शालेय समिती अध्यक्षा श्रीम. भाग्यरेखा दळवी, खजिनदार श्री. कृष्णा गावकर, सदस्य श्री. गणेश म्हसकर, श्री. विजय सावंत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मुकेश पवार, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद आणि सर्व विद्यार्थी यांनी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी यांचे व्यवस्थापक श्री. प्रसाद परब, श्री गुरु देसाई यांचे आभार मानले आहेत.

