*कोंकण एक्सप्रेस*
*बाजारपेठेतील सीसीटीव्ही तातडीने सुरू करा…*
*नगरसेवक देव्या सूर्याजी यांची मागणीः सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन केले सादर..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी शहरातील बाजारपेठ येथे बंद असणारे CCTV चालू करणे व रहदारीच्या ठिकाणी मच्छी मार्केट येथे होमगार्ड नेमणूक करणे यासाठी प्रभाग क्रमांक ६ मध्ये जय भवानी चौक सालईवाडा, जय प्रकाश चौक, गांधी चौक येथील बरीच वर्षे बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करावेत तसेच भर बाजारपेठेमध्ये होणारी चोरी व इतर समस्या अन्य पुरावे निशी बाबींसाठी कॅमेरांची अत्यंत गरज आहे यासाठी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी हि विनंती नगरसेवक श्री. देव्या सूर्याजी यांनी केली.
मच्छी मार्केट परिसरात दर रविवार व बुधवार होणारी वाहनांची कोंडी व त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहाणा-या रहिवासी व नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे या परिसरात १ रुग्णवाहिका सिरीयस रुग्ण घेऊन १तास कोंडी अडकली असे गंभीर प्रकार घडतात याला प्रशासन जबाबदार राहील म्हणून दर रविवारी बुधवारी ४ होमगार्ड किंवा पोलीस या ठिकाणी नेमण्यात यावे असे नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांना भेटून लेखी निवेदन देऊन केली याची प्रत मा. पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग व मा. पोलीस उप अधीक्षक यांना दिली यावेळी अॅड. प्रथमेश प्रभू, अॅड प्रसाद नाटेकर, प्रफुल गोंदावळे, निलांग सावंत उपस्थित होते.

