*कोंकण एक्सप्रेस*
*अचानक उलटी होऊन कणकवलीत ११ वर्षीय मुलाचा मृत्यू…*
*कणकवली ः संजना हळदिवे*
भाजीच्या दुकानात बसलेल्या ११ वर्षीय मुलाचा अचानक उलटी होऊन मृत्यू झाला. अजय लालू चव्हाण (वय ११) असे त्याचे नाव आहे. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास तेलीआळी डीपी रोड येथे घडली.
तेलीआळी डीपी रोड येथे प्रतीक डगरे यांचे भाजीचे दुकान आहे. या दुकानामध्ये अजय चव्हाण हा मुलगा बसला होता. दुपारी अकराच्या सुमारास त्याला तेथे उलटी झाली, त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला स्थानिकांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत असल्याचे तेथील डॉक्टरांनी स्पष्ट केले. अजय याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

