*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा युवा संसद २०२६ चे कणकवली कॉलेजमध्ये आयोजन*
*माय भारत’ आणि ‘एन.एस.एस. तर्फे युवकांना मिळणार हक्काचे व्यासपीठ*
*कणकवली ः संजना हळदिवे*
भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि संसदीय कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिल्ली येथे ‘युवा संसद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. ‘माय भारत’ आणि ‘युवा कनेक्ट’ अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाद्वारे युवकांना लोकशाहीची कार्यप्रणाली समजून घेण्याची सुवर्णसंधी मिळते. तसेच ‘विकसित भारता’साठी युवकांचे विचार सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होते. या उपक्रमामुळे युवकांमधील नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत होते.
जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया ‘युवा संसद २०२६’ ची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया बुधवार, दिनांक ४ मार्च २०२६ रोजी कणकवली कॉलेज, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. ‘माय भारत, सिंधुदुर्ग’ आणि ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS), सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने आयोजन केले जात आहे. सदर स्पर्धेमध्ये 18 ते 25 या वयोगटातील युवक माय भारत पोर्टल मार्फत नोंदणी करू शकतात. जिल्हास्तरीय युवा संसद 2026 साठी यावर्षी “आणीबाणीची पन्नास वर्षे आणि भारतीय लोकशाहीसाठी धडे” हा विषय देण्यात आला आहे. या विषयावरती युवक- युवती तीन मिनिटांमध्य, कोणत्याही भाषेमध्ये त्यांचे विचार मांडू शकतात. सदर निवड प्रक्रियेतून 05 युवक-युवतींची निवड राज्यस्तरीय युवा संसद 2026 साठी करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय युवा संसद मधून 3 युवक-युवती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या युवा संसद-2026 मध्ये करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय युवा संसद चे आयोजन मेरा युवा भारत अधिकारी, जिल्हा युवा अधिकारी, अपेक्षा मांजरेकर कार्यक्रम अधिकारी माय भारत सिंधुदुर्ग, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालक अजय शिंदे, प्राचार्य युवराज महालिंगे जिल्हा समन्वयक, वसीम सय्यद, यांच्या मार्गदर्शनाखाली. समन्वय अधिकारी डॉ. सुरेश पाटील, कार्यक्रमाधिकारी डॉ. किरण जगताप, प्रा. सागर गावडे, प्रा. पूजा मुंज, प्रा. विद्या मरकड करत आहेत. सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र युवक युवतीने सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

