केडीसीसी बँक राबविणार “आई” महिला पर्यटन धोरण…

केडीसीसी बँक राबविणार “आई” महिला पर्यटन धोरण…

*कोंकण एक्सप्रेस*

*केडीसीसी बँक राबविणार “आई” महिला पर्यटन धोरण…*

*संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय…*

*कोल्हापूर ः प्रतिनिधी*

कोल्हापूरः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे महाराष्ट्र शासनाचे “आई” हे महिला पर्यटन धोरण राबविणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. या धोरणामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये महिला सहभागाला मिळणार चालना मिळणार आहे. पर्यटन व्यवसायातील १५ लाखापर्यंत कर्जाचा व्याज परतावाही मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, या योजनेअंतर्गत महिलांनी पर्यटन व्यवसायासाठी १५ लाखापर्यंतचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जावरील व्याज परतावा हा बँक नियमाप्रमाणे पर्यटन संचालनालयाकडून दिला जाणार आहे.

या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला कोल्हापूर जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे. लाभार्थीचे बँक खाते आधार लिंक असावे. संबंधित पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. व्यवसायात ५० टक्के व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक असल्याचा अटी आहेत.

बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र सरकारने महिला केंद्रीत असे महिला पर्यटन धोरण बनवलेले आहे. हेच धोरण केडीसीसी बँकेने जिल्हाभर राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या धोरणाच्या माध्यमातून महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग आणि त्यांच्या आर्थिक विकासाचा स्तरही उंचावेल. या धोरणाच्या माध्यमातून केडीसीसी बँक जिल्ह्यातील महिलांना नवीन उद्योगाकरीता व जुना व्यवसाय वाढविण्याकरीता प्राधान्य देणार आहे. मी व्यक्तीशः आणि केडीसीसी बँक सदैव आमच्या माता- भगिनींच्या पाठीशी आहोत. असे प्रतिपादन यावेळी मुश्रीफ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!