*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ची महिलेला धडक महिला जागीच ठार*
*कुडाळ : प्रतिनिधि*
कुडाळ शहरातील कुडाळ-मालवण नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि स्कूटी मुपेड गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटी चालवणारी महिला कुडाळ च्या दिशेने येणारा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली गेल्याने ती चिरडून जागीच ठार झाली.
हा अपघात 11.15 वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलीस देखील अपघात ठिकाणी पोचले होते. आज होळी सण असल्याने या दिवशी अशी अशी घटना घडल्याने नागरिकांनकडुन हळवल वेक्त केला जात आहे. मृत महिलेचे नाव नीलिमा मेस्त्री असे आहे. ती नेरूर येथे राहणारी आहे. या अपघाताची खबर मिळताच क्षणी घटनास्थळी या भागातील नगरसेविका सौ. श्रेया गवंडे आणि भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू गवंडे यांनी धाव घेतली होती. चोरटी वाळू मोठ्या प्रमाणावर होत असल्याने असे अपघात होत आहेत त्यामुळे चोरट्या वाळूची होणारी वाहतूक राजरोज पणे होत असल्याने असे अपघात होतात कुडाळ नाबरवाडी रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे श्री. राजू गवंडे यांनी सांगितले.

