*कोंकण एक्सप्रेस*
*शिंदे शिवसेनेने पंचायत समिती सदस्यांचा गट केला स्थापन..*
*शरद धाऊसकर गटनेतेपदी निवडः जिल्हाधिकारी तृप्ती धौडमिसे यांना पत्र केले सादर..*
*सावंतवाडी : प्रतिनिधि*
शिवसेना पक्षाचे पंचायत समिती सदस्य यांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या समक्ष गट स्थापन करण्यात आला. गटनेते पदी न्हावेली पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुष्मिता जाधव, मायकल डिसोजा, उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे, प्रियांका देसाई आदी शिवसेना पक्षाचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत त्यांनी गट स्थापन केला.

