सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय बैठकीत अधिकाऱ्यांची गैरहजरी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय बैठकीत अधिकाऱ्यांची गैरहजरी

 

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय बैठकीत अधिकाऱ्यांची गैरहजरी*

*सावंतवाडी : प्रतिनिधि*

देव्या सुर्याजींचा संतप्त सवालः आरोग्यसारख्या गंभीर प्रश्नाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आस्था नसेल तर बैठक कशासाठी लावायला हव्यात..?

★ सावंतवाडी ता. ०२-: उपजिल्हा रुग्णालयाच्या रूग्णकल्याण समिती बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित राहत नसतील तर फक्त चहा-बिस्कीट खाण्यासाठी बैठक आयोजित केला जाते का ? असा सवाल रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला. आरोग्या सारख्या गंभीर प्रश्नातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आज उपजिल्हा रुग्णालय येथे रूग्ण कल्याण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यास जिल्ह्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौगुले, रूग्ण कल्याण समिती सदस्य आमदार प्रतिनीधी नगरसेवक देव्या सुर्याजी, सदस्य रवी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी श्री. सुर्याजी व श्री. जाधव यांनी सभेला प्रशासकीय अधिकारी उपस्थित न राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्यासारख्या गंभीर प्रश्नांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आस्था नसेल तर या बैठका कशासाठी लावायला हव्यात ? असा सवाल त्यांनी केला. पुढच्या बैठकीस अधिकारी उपस्थित नसतील तर बैठक होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, या बैठकीत आरोग्य समस्या, उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्था व फिजीशीयन व भुलतज्ञांच्या नेमणूकीबाबत पाठपुरावा करण्यासाठी चर्चा करण्यात आली. नकुतेच डॉ. वजराटकर सेवानिवृत्त झाले असून डॉ. ऐवळे देखील निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्तपदांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी रुग्ण कल्याण समिती सदस्यांनी केली. यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, सार्वजनिक बांधकामचे विनोद चव्हाण, रुग्णालय कर्मचारी आर. एस. शिंदे, रूपाली हेळेकर, अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!