भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार…

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार…

*कोंकण एक्स्प्रेस*

*भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार…*

*कोल्हापूर जिल्ह्यातील स्काऊट गाईड शिबिरात उल्लेखनीय कामगिरी….*

*सावंतवाडी : प्रतिनिधि*

कोल्हापूर जवळील सोनतळी येथे आयोजित भारत स्काऊट्स व गाईड्सच्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्य पुरस्कार प्राप्त केला. सेवाभाव, नेतृत्व, शिस्त व राष्ट्रनिष्ठा यांचे उत्कृष्ट दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी शाळेचे व जिल्ह्याचे नाव राज्यभरात उंचावले. या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आज शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता…

या विद्यार्थ्यांमध्ये सहा स्काऊट्स व सात गाईड्स मिळून एकूण तेरा जणांचा समावेश आहे. स्काउट्समध्ये नववीतील मंथन सावंतभोसले, वेदांग अंबापूरकर, अधिराज ठाकूर, स्पर्श धुरी, यजत रावळ तर आठवीतील वेद परांजपे यांचा समावेश आहे. गाईड्समध्ये नववीतील अद्विता दळवी, स्वरा थुरी, माही विठलानी, लिसा मेंडिस, रुची गावडे आणि आठवीतील स्वरा पंडित व स्फूर्ती सितावर यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना शाळेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंतभोसले, सिंधुदुर्ग जिल्हा स्काऊट्स व गाईड्स प्रशिक्षण आयुक्त क्लारा डिसोझा, सहाय्यक आयुक्त अरविंद मेस्त्री, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत लवकरच राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यासाठी सदिच्छा दिल्या. या यशस्वी कामगिरीमुळे संपूर्ण शाळेत अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून भविष्यातही चांगले काम करण्याचा मानस यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!