*कोंकण एक्सप्रेस*
*बोर्डवे गावात रेल्वे स्टेशन मंजुरीसाठी बबली राणे यांचे उपोषण*
*माजी खासदार विनायक राऊत यांची भेट*
*कणकवली ः संजना हळदिवे*
तालुक्यातील बोर्डवे गावात रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी ओसरगावच्या माजी उपसरपंच बबली राणे यांनी उपोषण सुरू केले आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने रेल्वे स्टेशन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपोषणस्थळी माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, बोर्डवे गावचा सरपंच सौ. वेदांगी पाताडे, माजी सेवानिवृत्त शिक्षक येडे, तसेच अनिल कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपोषणकर्त्यांनी शासनाने तातडीने दखल घेऊन बोर्डवे गावात रेल्वे स्टेशनला मंजुरी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
