*कोंकण एक्सप्रेस*
*एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत सातेरी हायस्कूलचे यश*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
नुकताच एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वेतोरे येथील श्री सातेरी हायस्कूलच्या वेद वेंगुर्लेकर, वैष्णवी नाईक व निधी सोनवडेकर या विद्याथ्र्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक समितीचे कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, उपकार्याध्यक्ष सूर्याजी नाईक, कार्यवाह प्रभाकर नाईक, मुख्याध्यापक के.डी.खरबडे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो – वेद वेंगुर्लेकर, वैष्णवी नाईक, निधी सोनवडेकर

