आकर्षक रंगरंगोटीने वर्गखोलीमध्ये निर्माण झाला शैक्षणिक माहोल

आकर्षक रंगरंगोटीने वर्गखोलीमध्ये निर्माण झाला शैक्षणिक माहोल

*कोंकण एक्सप्रेस*

*आकर्षक रंगरंगोटीने वर्गखोलीमध्ये निर्माण झाला शैक्षणिक माहोल*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

भिंतीवर रेखाटण्यात आलेली दैनंदिन आहाराबाबतची घोषवाक्ये, बाराखडीसोबतच शैक्षणिक अभ्यासक्रमामुळे निर्जिव भिंती बोलक्या झाल्या आहेत. अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणानुसार रंगविण्यात आलेल्या वर्गखोलीमध्ये प्रवेश करताच तेथील वातावरण अल्हाददायक वाटत आहे. दरम्यान, या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणारे हॉटेल कृष्णाचे मालक आनंद रेडकर व नगरसेवक समिधा रेडकर आदींचा वेंगुर्ला शाळा नं.4च्यावतीने सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ला शहरातील शाळा नं.4च्या अंगणवाडीची वर्गखोली रंगरंगोटी करून आकर्षक करण्याची गरज होती. यासाठी हॉटेल कृष्णाचे मालक आनंद रेडकर व नगरसेवक समिधा रेडकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने अंगणवाडीच्या वर्गखालीची रंगरंगोटी करून दिली. नुसती रंगरंगोटीच नाहीतर छोट¬ा मुलांच्या शिक्षणानुसार भिंतीवर बाराखडी, आहाराबाबत घ्यावयाची काळजी, मुलांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करणा-या सुचना तसेच विविध चित्रांची इंग्लिशमध्ये ओळखही करून देण्यात आली आहे. या आकर्षक आणि शिक्षणोपयोगी रंगरंगोटीमुळे या वर्गखोलीमध्ये शैक्षणिक माहोल निर्माण झाला आहे. शिक्षणाच्या अनुषंगाने रंगविण्यात आलेली वर्गखोली मुलांच्या शिक्षणात सिंहाचा वाटा उचलणार आहे.
दरम्यान, या रंगरंगोटीसाठी आर्थिक सहकार्य करणारे आनंद रेडकर आणि नगरसेवक समिधा रेडकर यांचा वेंगुर्ला शाळा नं.4 व अंगणवाडीतर्फे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक उमेश येरम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष हर्षद परब, माजी उपाध्यक्ष अस्मिता राऊळ, अॅड.श्रद्धा परब-बावीस्कर, वर्गखोलीचे रंगकाम करणारे श्री.मठकर, मुख्याध्यापक संतोष परब, अंगणवाडी सेविका नयना आरेकर, मदतनीस सत्यभामा गावडे, अन्य अंगणवाडी सेविका स्मिता कोणेकर, राधा बागवे, सुनिता कांबळे, मदतनीस अवनी जाधव यांच्यासह पालक कार्मेलिन डिसोजा, अन्वी जाधव, सुनंदा धारगळकर, सान्वी जाधव, धामनिया तांडेल तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!