*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सुप्रसिद्ध कवि कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिवस मराठी भाषेचा दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला प्रशालेच्या मराठी विभागाने मराठी भाषेची श्रीमंती उलगडणारे विविध उपक्रम विद्यार्थांनी सादर केले कवि कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले मराठी भाषेचा अभिमान असणाऱ्या कविता गायनाने कार्यक्रमाला वैभव प्राप्त झाले संगीत विभागाने मराठी कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली . कुमारी मेस्त्री या विद्यार्थीनीने कुसुमाग्रजाची बालकविता गायनाने कार्यक्रमाची उंची वाढविली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी शिक्षिका सौ सावंत पी पी मॅडम यांनी केले सौ विद्या शिरसाट यांनी मराठी भाषेचा अभिमान आपल्या भाषणातून मांडले . पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी मराठी साहित्य आणि वि .वा शिरवाडकर यांच्या साहित्य कृतीचा विचार भाषणातून मांडला मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी कवि कुसुमाग्रज यांच्या वाङ्मयाचे विचार व्यक्त केले आभार शाळेच्या विद्यार्थांनी मानले या कार्यक्रमाचे नियोजन मराठी अध्यापक श्री सुरज पवार सर यांनी केले .
कार्यक्रमाला सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!