कणकवली शहर भाजपा कडूनही कोविड लसीकरणासाठी लाभार्थ्यांना मोफत रिक्षेची सुविधा

कणकवली शहर भाजपा कडूनही कोविड लसीकरणासाठी लाभार्थ्यांना मोफत रिक्षेची सुविधा

*कोकण Express*

*कणकवली शहर भाजपा कडूनही कोविड लसीकरणासाठी लाभार्थ्यांना मोफत रिक्षेची सुविधा!*

*तर नागरिकांना लसीकरणासाठी भाजपकडून संपर्क साधण्याचे करण्यात आले आवाहन!*

​*कणकवली ःःप्रतिनिधी* 

शहर भाजपच्या वतीने कणकवली शहरातील कोविड लसीकरणासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर नेण्यासाठी आजपासून मोफत रिक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. कणकवली भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शहरातील ​१७ प्रभागातील नागरिकांच्या सुविधेसाठी भाजपकडून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

कणकवली शहरातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेविका मेघा गांगण, शिशिर परुळेकर, अण्णा कोदे यांच्याशी संपर्क साधण्याची ही आवाहन कोदे यांनी केले आहे. ज्या प्रभागातून नागरिकांचा लसीकरणास जाण्यासाठी संपर्क होईल त्या ठिकाणी भाजपा मार्फत मोफत रिक्षा पाठवून देण्यात येणार आहे. व लसीकरण झाल्यानंतर त्या नागरिकांना पुन्हा घरपोच सोडण्यात येणार असल्याचे ही कोदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!