जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेत राजश्री भांबर प्रथम

जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेत राजश्री भांबर प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेत राजश्री भांबर प्रथम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे वेंगुल्र्याचे पद्भूषण कवी मंगेश पाडगांवकर यांची सख्खी बहिण कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर यांच्या स्मरणार्थ तिचे पुतणे नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी आयोजित केलेल्या काव्य वाचन स्पर्धेत वेंगुर्ला येथील राजश्री भांबर यांनी सादर केलेल्या “एक शिक्षक होईन म्हणतोय’ या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला.
कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धा घेण्यासाठी अनिल सौदागर यांनी नगर वाचनालय या संस्थेकडे 2 लाख रूपयांचा कायम निधी ठेवला आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्रातील कवींना आवाहन करून कविता मागविल्या होत्या. त्यातील निवडक 25 कवींना आपल्या कविता सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात आले होते. यात वेंगुर्ला येथील राजश्री भांबर यांनी सादर केलेल्या “एक शिक्षक होईन म्हणतोय’ या कवितेला प्रथम, दाभोली येथील प्रितम ओगले यांच्या “शरणागता’ या कवितेला द्वितीय, सावंतवाडी येथील भाऊसाहेब गोसावी यांच्या “गुंड¬ा आकाशी पहाता’ या कवितेला तृतीय तर सावंतवाडी येथील मृण्मयी पोकळे हिच्या “खंत’, मालवण येथील नितीन वाळके यांच्या “आठवणीतला मे महिना’ तसेच रेडी येथील सोनाली नाईक हिच्या “गीत गावे पाण्याचे’ या कवितांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत मठ येथील रश्मी भगत हिच्या “जगण्याची किंमत तेवढी मोजून बघ’ या स्त्री सबलीकरणाच्या कवितेला जनार्दन शेटये यांच्याकडून 500 रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कवी रघुवीर परब व ज्येष्ठ साहित्यिक प्रा.नारायण गिरप यांनी केले. या कार्यक्रमात संस्थेचे दाते जनार्दन शेटये, रघुवीर परब व नारायण गिरप यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, काव्यवाचन स्पर्धेसाठी आलेल्या कवितांपैकी निवडक 30 कवितांचे पुस्तक प्रकाशित केले जाणार असल्याची माहिती नगर वाचनालय संस्थेकडून देण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब यांच्यासह स्मिता वागळे, रत्नप्रभा प्रभूसाळगांवकर, अमृत काणेकर तसेच जिल्ह्रातील कवी, संस्थेचे वाचक व सभासद मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह कैवल्य पवार यांनी, सूत्रसंचालन महेश बोवलेकर यांनी तर आभार कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!