*कोंकण एक्सप्रेस*
*श्री वांद्रेश्वर देवस्थानचा वार्षिक उत्सव १ मार्च*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
सुंदर भाटले येथील श्री देव वांद्रेश्वर देवस्थानचा वार्षिक उत्सव रविवार दि. १ मार्च रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थ प्रसाद तसेच रात्री ९ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘शैलपुत्रा देवी’ हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव वांद्रेश्वर कला क्रीडा मंडळातर्फे केले आहे.

