पंचायत समिती सभापती व उपसभापती*

पंचायत समिती सभापती व उपसभापती*

*कोंकण एक्सप्रेस*

*पंचायत समिती सभापती व उपसभापती*

*निवडणुकीसाठी 9 मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका):-*

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या असून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी पहिली बैठक जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग पंचायत समिती सभागृह येथे सोमवारी 9 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे.
पंचायत समिती सभापती हे पद खालील प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत
पंचायत समिती वैभववाडी- सर्वसाधारण, कणकवली- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), देवगड- सर्वसाधारण, मालवण- सर्वसाधारण (महिला), कुडाळ- सर्वसाधारण, वेंगुर्ला- नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), सावंतवाडी- अनुसूचित जाती (महिला), दोडामार्ग- सर्वसाधारण (महिला),
उपरोक्त सभापती पंचायत समिती यांचा कालावधी अडीच वर्षाचा आहे. त्यामुळे या कालावधीकरिता सभापती पदाची निवड करण्यात येईल. सभापती पद विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित असले तेव्हा त्या विशिष्ट प्रवर्गाची व्यक्ती त्या पंचायत समितीच्या कोणत्याही निर्वाचक गणातून निवडून आली असली तरी सभापती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र राहील. तेच तत्व महिला आरक्षणासाठी लागू राहील.
सभापती पदाची निवडणूक झाल्यानंतर त्याच पद्धतीने उप सभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य यांना सदर सभेत उपस्थित राहण्याबाबत या कार्यालयाकडून तसेच संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत नोटीसीद्वारे कळविण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य यांना 9 मार्च 2026 रोजी त्यांचे संबंधित पंचायत समिती कार्यालयात, सभागृहात सभापती, उपसभापती या पदाच्या निवडीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!