*शिरगांव येथे प्रधानमंत्री जीवन विमा योजनेतर्गत धनादेशाचे वितरण*

*शिरगांव येथे प्रधानमंत्री जीवन विमा योजनेतर्गत धनादेशाचे वितरण*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगांव येथे प्रधानमंत्री जीवन विमा योजनेतर्गत धनादेशाचे वितरण*

*शिरगाव / संतोष साळसकर*

प्रधानमंत्री जीवन विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा शिरगाव येथे चार लाख रुपयांच्या विमा रकमेचा धनादेश लाभार्थ्यांच्या वारसांना प्रदान करण्यात आला. हा धनादेश सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अॅड. प्रकाश बोडस यांच्या हस्ते देण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत प्रधानमंत्री जीवन विमा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँक शिरगाव शाखेचे खातेदार मंदार राजेंद्र माळवदे यांचा विमा उतरविण्यात आला होता. त्यांचे दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी अपघाती निधन झाले. त्यानंतर शिरगाव शाखेमार्फत विम्याचा प्रस्ताव सादर करून त्याचा नियमित पाठपुरावा करण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर चार लाख रुपयांचा विमा धनादेश त्यांच्या वारस पत्नी साधना माळवदे यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अॅड. प्रकाश बोडस, शिरगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक बापू शेळके, शिरगाव विकास सोसायटीचे चेअरमन मंगेश लोके, साधना माळवदे, देवगड तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक संतोषकुमार फाटक, सतीश धरणे, युवराज माळवदे, शरद साटम, बँकेचे कर्म तसेच लाभार्थ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!