*कोकण Express*
*तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण निलंबित..*
*सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांना विनयभंगप्रकरणी अटक होऊन जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या शासनाने निलंबन केले आहे. एका कंत्राटी कर्मचारी महिलेच्या विनयभंग प्रकरणी ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिलेल्या डाॅ चव्हाण यांःचे निलंबन अटळ होते. तरीही जामिनावर मुक्त झालेल्या श्रीमंत चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल होत रुग्णालयीन कामकाजात हस्तक्षेप केला होता. याबाबतच्या तक्रारी झाल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत त्यांच्या अखेर निलंबन केले आहे.जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांनी विनयभंग केला असल्याबाबत जिल्हा रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षक महिला कर्मचार्याने सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारी नुसार डॉ चव्हाण यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आपल्याला या प्रकर्णी अटक होऊ नये यासाठी प्रथम येथील जिल्हा न्यायालयात नंतर मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रथम जिल्हा न्यायलयात आणि नंतर उच्च न्यायलयातही हा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला होता.मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिन अर्ज फेटाळल्या नंतर सुमारे 14 ते 15 दिवसानंतर डॉ चव्हाण यांना सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी 7 एप्रिल रोजी अटक केली होती. त्यानंतर 8 एप्रिल रोजी न्यायलायत हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली होती. या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायल्यात हजर केले असता न्यायल्याने त्यांना न्यायलयीन कोठडी सुनाविली होती. त्यानंतर जामिना साठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला होता. तेव्हा त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती.दरम्यान डॉ चव्हाण यांनी जामिन मुक्त होताच सोमवारी जिल्हा रुग्णालयात दाखल होत जिल्हा शल्यचिकत्सक कशाचा ताबा घेतला आणि सर्व फ़ाइल आपल्या कड़े पाठविण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना केल्या.