ओसरगाव टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

ओसरगाव टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*ओसरगाव टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न*

*कणकवली ः संजना हळदिवे*

ओसरगाव टोल नाका येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली मार्फत उपकेंद्र ओसरगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री गुरु तेज बहादुर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरेश्वर ढोके यांनी नियमित आरोग्य तपासणी केली. तसेच किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून आवश्यक ते उपचार देण्यात आले.

यावेळी दीप्ती मोंडकर (स्टाफ नर्स – NCD), आरोग्य सेविका रश्मी सोहनी, आशा सेविका नेहा आलव, मदतनीस समीरा राणे आदी उपस्थित होते.

शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तसेच इतर असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात आली व गरजूंना मोफत औषधोपचार देण्यात आले. नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!