उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे आरोग्य सेवेतील सुधारणा घडविण्यासाठी शिष्टमंडळाची सदिच्छा भेट…!

उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे आरोग्य सेवेतील सुधारणा घडविण्यासाठी शिष्टमंडळाची सदिच्छा भेट…!

*कोंकण एक्सप्रेस*

*उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे आरोग्य सेवेतील सुधारणा घडविण्यासाठी शिष्टमंडळाची सदिच्छा भेट…!*

*कणकवली – प्रतिनिधी*

आम्ही कणकवलीकर आणि रुग्ण हक्क कृती समितीच्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथील नूतन वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीम. निलिमा इनामदार यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. सार्वजनिक आरोग्य सेवेतील समस्या, त्रुटी व अनियमितता याबाबत शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. सर्वसामान्य नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या अडचणींबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
यावेळी रूग्ण हक्क कृती समिती अध्यक्ष विनायक मेस्त्री, नितेश भोगले, सादिक कुडाळकर, रूग्ण हक्क कृती समिती समन्वयक अशोक करंबेळकर, उमेश बुचडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , यासोबतच उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, सहाय्यक अधिसेविका एस एस तीवरेकर आदी उपस्थित होते.
दि.२० डिसेंबर २०२५ रोजी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर रुग्णालयातील काही समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न झाले असले, तरी अद्याप अनेक बाबींमध्ये सुधारणा अपेक्षित असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
यावर वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीम. निलिमा इनामदार यांनी सकारात्मक भूमिका घेत, रुग्णालयात दर्जेदार व सुसूत्र आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन दिले. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सुसंवाद ठेवून सेवा अधिक परिणामकारक करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रुग्ण, नातेवाईक, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींनीही रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आम्ही कणकवलीकर आणि रुग्ण हक्क कृती समितीच्या वतीने करण्यात आले. ठराविक कालावधीनंतर रुग्णालय व्यवस्थापनासोबत संवाद साधून सेवा अधिक सक्षम व दर्जेदार होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

उपजिल्हा रुग्णालयातील नूतन वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलीमा इनामदार व आरोग्य कर्मचारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करताना शिष्टमंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!