*कोंकण एक्सप्रेस*
*कलमठमध्ये २८ पासून विविध कार्यक्रम –शिवतेजा मित्रमंडळातर्फे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कलमठ-बाजारपेठ येथील पिंपळपार येथे शिवतेजा मित्रमंडळातर्फे २८ फेबु्रवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त २८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शनिवार २८ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, १२.३० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भजनाचा कार्यक्रम, ९.३० वा. शिवतेजा मित्रमंडळनिमित्त ‘कल्लीवट्टी’ नाट्य सादर होईल. रविवार १ मार्च रोजी रात्री ९.३० वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर व कार्यकारिणीने केले आहे.

