महापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’

महापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’

*कोंकण एक्सप्रेस*

*महापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’…*

*नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादनः महिलांचा व्वा वुमनिया ह्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचा उत्साहात शुभारंभ..*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शहरातील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित ‘महापुरुष महाउत्सव’ म्हणजे कणकवलीचा मिनी पर्यटन महोत्सव आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. महाउत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यासह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात उत्सवामुळे भक्तिमय व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे.

नगराध्यक्ष पारकर म्हणाले, कणकवलीच्या जडणघडणीत महापुरुष मित्रमंडळाचे मोठे योगदान आहे. शहरातील नागरिकांनी माझ्‌यावर विश्वास ठेवून नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. येत्या पाच वर्षांत कणकवलीचा सर्वांगीण विकास करणे हे माझे ध्येय असून शहरवासीयांनी तसेच विविध मंडळांनी सहकार्य करावे. शिमगोत्सवातील मांडावरील स्पर्धा असो वा अन्य उपक्रम, मंडळ सातत्याने शहराच्या वैभवात भर घालत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!