अतुल काळसेकर यांची भाजप कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती

अतुल काळसेकर यांची भाजप कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती

*कोंकण एक्सप्रेस*

*अतुल काळसेकर यांची भाजप कोकण विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती…*

*प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा; भाजपची कोकणात मोर्चेबांधणी….*

*मुंबई प्रतिनिधी*

भारतीय जनता पक्षाच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. कोकणात पक्षाची पकड घट्ट करण्याच्या दृष्टीने काळसेकर यांची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, कोकणातील पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी अनुभवी कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे. अतुल काळसेकर यांच्या निवडीसोबतच पक्षाने इतरही विविध पदाधिकाऱ्यांच्य नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नव्या फळीमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये भाजपच्या कामाला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!