*​आयुष्यमान भारत ‘वय वंदना योजने अंतर्गत जिल्ह्यात दिनांक २० फेब्रुवारी ते १३ मार्च 2026 कालावधीत विशेष अभियान*

*​आयुष्यमान भारत ‘वय वंदना योजने अंतर्गत जिल्ह्यात दिनांक २० फेब्रुवारी ते १३ मार्च 2026 कालावधीत विशेष अभियान*

*कोंकण एक्सप्रेस*

*​आयुष्यमान भारत ‘वय वंदना योजने अंतर्गत जिल्ह्यात दिनांक २० फेब्रुवारी ते १३ मार्च 2026 कालावधीत विशेष अभियान*

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्यमान भारत वय वंदना’ योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनातर्फे २० फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६ या कालावधीत विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. ७० वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळवून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 23,205 ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यमान वंदना योजनेचे कार्ड काढलेले आहे. उर्वरित लाभार्थी यांना कार्ड काढण्याकरिता खालील प्रमाणे विशेष मोहीमचे आयोजन करण्यात येत आहे.
*​अभियानाची वैशिष्ट्ये आणि स्वरूप*
​या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेचे यश वाढवण्यासाठी प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि पेन्शनर्स असोसिएशन यांची विशेष मदत घेण्याचे निश्चित केले आहे. या संघटनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचून त्यांना नोंदणी प्रक्रियेत सुलभता आणली जाईल.
*​योजनेचे मुख्य फायदे*:
*​वयोमर्यादा*: ७० वर्षे पूर्ण केलेले सर्व ज्येष्ठ नागरिक (उत्पन्नाची अट नाही).
*​विमा संरक्षण*: प्रति कुटुंब वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार.
*​विशिष्ट कार्ड*: पात्र लाभार्थ्यांना ‘वय वंदना’ आयुष्मान कार्ड दिले जाईल.
*​सहभाग*: ज्यांच्याकडे आधीच आयुष्मान कार्ड आहे, अशा कुटुंबातील ७० वर्षांवरील वृद्धांना अतिरिक्त ५ लाखांचे टॉप-अप कवच मिळेल.
*​नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे*:
​नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असून लाभार्थ्यांकडे केवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असल्यास ही प्रक्रिया अधिक जलद होईल.
​”जिल्ह्यातील एकही पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. ​तरी याद्वारे आवाहन करण्यात येते की, २० फेब्रुवारी ते १३ मार्च 2026 या कालावधीत आयोजित शिबिरांमध्ये जाऊन अथवा आपल्या जवळच्या सर्व शासकीय रुग्णालय, योजने अंतर्गत सर्व अंगीकृत खाजगी रुग्णालय ,सीएससी (CSC) केंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांनी आपली नोंदणी करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!