कणकवलीत उपजिल्हा रुग्णालय अधिक्षकपदी डॉ. निलीमा इमानदार

कणकवलीत उपजिल्हा रुग्णालय अधिक्षकपदी डॉ. निलीमा इमानदार

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत उपजिल्हा रुग्णालय अधिक्षकपदी डॉ. निलीमा इमानदार*

*कणकवली येथील पत्रकारांशी साधला संवाद ; रुग्णालयातील असलेल्या समस्यांबाबत केली चर्चा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. नीलिमा इनामदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. कणकवली येथील पत्रकारांशी डॉ. नीलिमा इनामदार यांनी संवाद साधत उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. रुग्णांची सोनोग्राफी , गंभीर रुग्णांसाठी आयसीयू दुरुस्ती , रुग्णांची बाह्य रुग्ण तपासणीत वाढ करण्याबाबतची सुचना पत्रकारांनी मांडल्या. त्यावर आपण येत्या काळात सकारात्मक निर्णय घेवून रुग्णांना दर्जेदार सेवा दिली जाईल , असा विश्वास उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. नीलिमा इनामदार यांनी व्यक्त केला.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक दालनात येथील डॉ. नीलिमा इनामदार यांनी पत्रकारांशी पदभार स्विकारल्यानंतर संवाद साधला. यावेळी पत्रकार भगवान लोके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी माजी अध्यक्ष अजित सावंत , चंद्रशेखर देसाई , राजेश सरकारे , उमेश बुचडे , दर्शन सावंत , मयुर ठाकुर, मोहन पडवळ , रुग्णालयाचे प्रशांत बुचडे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या चर्चेदरम्यान , डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ आणि रुग्णसेवा सुधारण्याबाबत असलेल्या रुग्णांच्या अपेक्षा पत्रकारांनी मांडल्या. रुग्णांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा देण्याबाबत आपण सकारात्मक आहोत , त्यासाठी आपण स्वत: दाखल रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी स्वत: प्रत्येक वॉर्ड मध्ये भेटी देईन. रिक्त पदे व आवश्यक यंत्र सामुग्री मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. निलीमा इमानदार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!