राज्य सरकार द्वारे होणाऱ्या गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण,सीमांकन गाबीत समाजाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी गरजेचे

राज्य सरकार द्वारे होणाऱ्या गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण,सीमांकन गाबीत समाजाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी गरजेचे

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्य सरकार द्वारे होणाऱ्या गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण,सीमांकन गाबीत समाजाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी गरजेचे*

*विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमन फेडरेशन*

*मालवण ः प्रतिनिधी “

राज्य सरकार तर्फे होणाऱ्या गाबीत समाज सर्वेक्षण व सीमाकंन प्रक्रिया प्रशासना बरोबर समन्वय्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने कोळी समाजाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमाकंन करण्यासाठी आदेश दिले आहेत कोळी समाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्या नंतर दिनांक 13/02/2026 रोजी विभागीय आयुक्त कोकण यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील गाव व वाडीनिहाय लोकसंख्या गाबीत समाजाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व सीमाकंन करण्याच्या सूचना दिल्या असून त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मालवण,देवगड वेंगुर्ला तालुक्यातील तहसीलदार यांना 13/2/26 रोजी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत प्रत्यक्ष मात्र स्थानिक तहसीलदार यांच्या कडून गाबीत समाजास अपेक्षित असलेले सर्वेक्षण होताना दिसत नसून गाबीत समाजानेही सदर सर्वेक्षण सीमाकंन गांभीर्याने घेणे गरजेचे असून समाजाच्या भविष्यातील सामाजिक आर्थिक स्थिरतेसाठी हे सीमाकंन सर्वेक्षण होणे गरजेचे आहे जिल्ह्यातील किनारपट्टीवर वसलेल्या 25000 पेक्षा जास्त कुटुंबांसाठी हे सर्वेक्षण महत्वाचे आहे आज ज्या किनारपट्टी ला बांधकाम काढायच्या नोटीस येत आहेत सीमाकंन, सर्वेक्षण झाले असते तर ही वेळ आली नसती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गाबीत समाजाची लोकसंख्या,समाजाच्या माध्यमातून पारंपारिक मच्छिमारी साठी वापरात असलेल्या समुद्र, नदी,खाडी किनाऱ्याच्या जागा, समुद्र किनारी रापण, लाकडी होड्या मासे खारवणे, सुकविणे तसेच नौका ठेवण्यासाठी, मासे खरेदी विक्री साठी तात्पुरत्या स्वरूपात शेरी (सरकारी जागेत)कावणे तसेच अनेक वर्ष अश्याच जागेत बेघर गाबीत समाजाची घरे यांचे सर्वेक्षण, सीमाकंन कोळी समाजाने आपल्या भवितव्याच्या उद्देशाने मुंबई मध्ये संघटित पणे केंद्र व राज्य सरकार कडून अनेक त्यांच्या वस्त्या कोळी वाडे जाहीर करून घेतल्या असून याही सीमाकंन व सर्वेक्षण साठी नियोजन पद्धतीने काम सुरु केले आहे या उलट गाबीत समाजाच्या वाडीवस्त्या मध्ये या सर्वेक्षणा विषयी माहिती नाही असे वातावरण किनारपट्टी भागात आहे गाबीत फिशरमन फेडरेशन च्या माध्यमातून गाबीत समाजासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थेच्या गाबीत समाजातील विविध राजकीय पक्षाशी जोडलेले लोकप्रतिनिधी, समाजासाठी कार्य करत असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्य सरकार द्वारे गाबीत समाजाच्या वाडी वस्ती सीमाकंन,सर्वेक्षण गाबीत समाजासाठी सकारात्मक होण्यासाठी तालूका निहाय दौरा आयोजित केला जाणार आहे लवकरच यांची तारीख सर्वानुमते जाहीर करण्यात येईल असे विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमन फेडरेशन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!