*कोंकण एक्सप्रेस*
*बंड्या मांजरेकर मित्र मंडळ आयोजित बैलगाडा शैर्यत 28 फेब्रुवारी रोजी*
*वैभववाडी ( प्रतिनिधी)*
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे 28 फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यत स्पर्धा रंगणार आहे. गेली काही वर्ष बंड्या मांजरेकर मित्र मंडळाच्यावतीने स्पर्धा आयोजित केली जाते यावर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकामुळे स्पर्धा लांबणीवर पडली होती आत्ता या स्पर्धेची तारीख निश्चित झाली असून 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून दिवसभर ही स्पर्धा सुरु राहणार आहे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड सह कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी आणि स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात

