*कोंकण एक्सप्रेस*
*”स्वच्छ जल-स्वच्छ मन” या उपक्रमाअंतर्गत कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा परिसराची केली स्वच्छता*
*उपगराध्यक्ष सुशांत नाईक स्वछता मोहिमेत सहभागी*
*या परिसरात व्यसनाधीन व्यक्ती परिसर अस्वच्छ करून नशा करताना आढळून आल्यास कडक कारवाई करणार – सुशांत नाईक*
*कणकवली ः संजना हळदिवे*
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व कणकवली नगरपंचायत यांच्यासंयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल स्वच्छ मन” प्रोजेक्ट अमृत या उपक्रमाअंतर्गत शहरातील कणकनगर गणपती साना ते केटी बंधारा या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी कनकनगर प्रभागाचे नगरसेवक तथा कणकवली नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक हे या स्वछता मोहिमेत सहभागी झाले. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या 80 सेवादल यांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला तसेच केटी बंधाऱ्यावरील नदीपात्रातील कचरा देखील या सेवादल यांनी बाहेर काढला. या स्वछता मोहिमेत कनकनगर परिसरातील रहिवाशी देखील उपस्थित होते. हा परिसर स्वच्छ केल्यामुळे कनकनगर वासियांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
सुशांत नाईक यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या “स्वच्छ जल-स्वच्छ मन” या उपक्रमाचे व त्यांच्या पूर्ण सेवादलाचे कौतुक केले. आपण हाती घेतलेला स्वच्छतेचा वसा आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्याचे नागरिकांना आव्हाहन देखील केले. तसेच या केटी बंधारा परिसरात मध्यपान – नशा करणाऱ्या व्यक्तींचा वावर आढळून येतो व त्यांच्यामुळे हा परिसर अस्वच्छ होतो, आता या परिसरात कोणती व्यक्ती मध्यपान किंव्हा नशा करताना आढळून नगरपंचायतच्या माध्यमातून कडक कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी सुशांत नाईक यांनी दिला.
यावेळी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन संयोजक विलास जाधव, संचालक महेश पांचाळ, कनकनगर वासिय तसेच संत निरंकारी फाउंडेशनचे 80 स्वयंसेवक उपस्थित होते.

