*कोंकण एक्सप्रेस*
*यशाच्या शिखरात गुणवत्ते शिवाय पर्याय नाही: श्री.सुनील नाईक*
*मालवण ः प्रतिनिधी*
आजचे युग हे स्पर्धेचे युगअसून प्रत्येक ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे.आज असाच संघर्ष तुमच्या आयुष्यात येऊ घातलेला आहे. अश्या संघर्षामध्ये आपल्याला यशाची शिखरे गाठायची असून असे यश हे गुणवत्तेतूनच येईल व यासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थी विकासाबरोबरच कौशल्याधिष्ठित शिक्षण दिलेले आहे नक्कीच येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत आपण उज्वल संपादन कराल ही ईश्वरचरणी प्रार्थना करून शताब्दी महोत्सवातील डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या स्वप्नातील आशावाद आपण कायम ठेवाल व येणाऱ्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी म्हणून नावलौकिक मिळवाल असा आशावाद व्यक्त करताना प्रशालेतील मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे पर्यवेक्षक श्री.महेश भाट व सर्व शिक्षक यांनी घेतलेली मेहनत व येऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबद्दल आपले मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावीच्या विद्यार्थी ध्रुवी भाट,हर्षल कानुरकर
यांनी आपली मनोगते व्यक्त केली.याच बरोबर श्री.कानुरकर पी व्ही ,पेंडुरकर एस सी यांनी मनोगते व्यक्त केली.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी माध्यमिक शाळा परीक्षा याच्याविषयी बहुमोल मार्गदर्शन करताना विद्यार्थिनी गुणवंत होण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर स्कूल कमिटी अध्यक्ष श्री सुधीर उर्फ बापू वराडकर,सहसचिव साबाजी देविदास गावडे, पर्यवेक्षक श्री महेश भाट,प्रशालेचे शिक्षक श्री हडलगेकर के एम ,श्री राऊळ ई एस श्री चांदरकर एस ए,सौ चांदरकर एस एस, सौ दळवी एस आर, कुमारी परब ए एस ,श्री.भूषण गावडे
शिक्षकेतर कर्मचारी श्री कुबल के एन तसेच प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक रोटरी क्लब कणकवली व 1985च्या माझी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी दिलेला दहावी अभ्यासक्रम ॲप,स्मिता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कट्ट्याच्या माध्यमातून व संचालिका सौ श्रद्धा नाईक यांनी दहावीसाठी दिलेले ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन,जिल्ह्यातील सर्व विषयांचे तज्ञ मार्गदर्शन, सराव चाचणी व सातत्यपूर्ण अभ्यासक्रम वर्ग, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचा असलेला, “विद्यार्थी गुणवत्ता दृष्टिकोन”, मुख्याध्यापिका व पर्यवेक्षक यांनी केलेले तंतोतंत नियोजन, सर्व विषय शिक्षकांनी घेतलेली मेहनत, विद्यार्थ्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न , शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य या सर्व बाबींचा आढावाआपल्या प्रास्ताविक ते मधून वर्गशिक्षक श्री बी एम वाजंत्री यांनी घेतला. तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. स्वराली ताम्हणकर व माऊली थवी हिने केले तर आभार प्रदर्शन १०अ वर्गशिक्षिका सौ शिरोडकर व्हि एम यांनी केले.जे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने
शताब्दी वर्षानिमित्ताने इयत्ता दहावीच्या उज्वल परंपरेनुसार विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या परीक्षामध्ये यशस्वी होण्यासंदर्भात
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीयजे
विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार
अध्यक्ष श्री.अजयराज शरद वराडकर – आनंद मधुकर वराडकर – उपाध्यक्ष, शेखर सदानंद पेणकर-इ उपाध्यक्ष, श्रीमती विजयश्री श्रीकांत देसाई – सचिव,रविंद्रनाथ बाळकृष्ण पावसकर – खजिनदार, सुधीर चंद्रकांत वराडकर- संचालक, महेश दिगंबर वाईरकर -संचालक, सौ. श्रुती शिवानंद वराडकर – संचालिका, सौ. स्वाती सुधीर वराडकर – संचालिका, आनंद रमेश टेमकर – संचालक, नितीन शशिकांत गिरकर – संचालक तसेच संस्थेचे सन्माननीय सल्लागार माजी विद्यार्थी श्री. नारायण पेणकर, श्री. सुहास वराडकर, श्री. संतोष साटविलकर, श्री. व्हिक्टर डॉन्टस यांनी शुभेच्छा दिल्या.

