सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू*

*मुंबई-विजयदुर्ग रो-रो (बोट) सर्व्हिसला 1 मार्चचा मुहूर्त*

*मंत्री नितेश राणे स्वतः 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग करणार प्रवास*

*सिंधुदुर्ग :*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो फेरी सेवा सुरू होत असून या सेवेमुळे प्रवाशांना जलमार्गाने जलद व आरामदायी प्रवास करता येणार आहे. या ऐतिहासिक प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः प्रवाशांसोबत एम२एम फेरीतून प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या सेवेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नवीन वेळापत्रकानुसार १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई येथून फेरी सुटून दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचणार आहे. त्यानंतर परतीची सेवा दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटून सायंकाळी ७ वाजता मुंबईत पोहोचेल. मार्च महिन्यात ठराविक दिवशी ही सेवा सुरू राहणार असल्याचे वेळापत्रकात नमूद आहे. ही रो-रो सेवा सुरू झाल्याने कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक प्रवासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच रस्त्यावरील दीर्घ प्रवासाला पर्याय मिळाल्याने प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.

प्रशासनाचे आवाहनः प्रवाशांनी प्रस्थान वेळेच्या किमान ९० मिनिटे आधी बंदरावर उपस्थित राहावे. हवामान व तांत्रिक कारणांनुसार वेळापत्रकात बदल होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!