*कोंकण एक्सप्रेस*
*शिवजयंती कलमठ उत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कलमठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे कलमठ-बाजारपेठ येथील श्री देव काशिकलेश्वर मांड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उद्योजक सुनील नाडकर्णी व सुशांत राऊळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, जि. प. सदस्य सुप्रिया मेस्त्री, पं. स. सदस्य गुरुनाथ वर्देकर, माजी सरपंच मिलिंद मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, स्वाती नारकर, नितीन पवार, सचिन खोचरे, श्रेयश चिंदरकर, माजी सैनिक हरि रावराणे, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, महादेव उर्फ आबा ढवण, नंदकुमार हजारे, विनोद कोरगावकर, अण्णा मठकर, विलास गुडेकर, अनिल मेस्त्री, गिरीश धुमाळे, किशोर लाड, दिनेश लाड, तनोज कळसुकर, अनंत हजारे, धीरज मेस्त्री, सागर गावडे, सिकंदर मेस्त्री, पत्रकार तुषार हजारे, तनवीर मुदस्सर, घाडीगावकर, दिगंबर दंताळ, सचिन पेडणेकर, स्वच्छतादूत मंगेश कदम, नितेश भोगले, नितीन पेडणेकर, नितीन उर्फ आबा मेस्त्री, विनय खोचरे, दादा पावसकर,संतोष मेस्त्री, राजू पेंडुरकर,संजय खोचरे, श्रीकांत बुचडे, बाबू हुन्नरे, महेश परब,प्रवीण सावंत,संतोष रेवंडकर,मनोज घाडी, सिद्धेश घाडीप्रसाद मठकर, निश्चय हुन्नरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी शिवरायांना मानवंदना दिली. मान्यवरांचे शिवजयंती उत्सव समितीतर्फे स्वागत करण्यात आले. एसएसएस प्लस १ बीडवाडीच्या पथकाने चित्तथरारक शिवकालानी मर्दानी खेळ सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. शिवजयंतीनिमित्त शिवकाळातील दुर्मिळ नाणी व शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत हेरंब राऊळ (एसएस हायस्कूल) तर नमिता चिंदरकर (जि. प. शाळा कलमठ-कुंभारवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पहिली ते चौथी गटात – द्वितीय – ऋग्वेद मराठे (आयडियल स्कूल, वरवडे), तृतीय-अखिलेश घोरपडे यांनी क्रमांक पटकाविला. कार्तिकी खावरे (विद्यामंदिर) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. ५ ते ८ वी गटात – द्वितीय-योगिनी मसुरकर (एस.एस. हायस्कूल), तृतीय-स्वरा खरात (जि. प. शाळा कलमठ-बाजारपेठ), उत्तेजनार्थ पारितोषिक स्नेहा गिते (एस.एस.हायस्कूल) यांनी पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण पी.व्ही.कांबळे यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सायंकाळी ओमकार मित्रमंडळ व शिवतेजा मित्रमंडळातील कलाकारांनी शिववैभव सोहळा सादर करून शिवरायांचा इतिहास जागा केला. या सोहळ्यातील अबजलखानाचा वध हा कलाविष्कार लक्षवेधी ठरला. हा सोहळा पाहून रसिकांचे मन भारावून गेले रात्री वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची पडीक एकांकिका सादर झाली. एकांकिकेतील कलाकरांना उत्सव समितीच्यावतीने अॅड. सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ही एकांकिका सादरीकरणासाठी नंदकुमार हजारे,नीलेश महेंद्रकर गुरुजी, विनायक (बाळू)मेस्त्री. दिनेश लाड, विठ्ठल गावडे, मंदार कुशे यांचे सहकार्य लाभले.

