तेली समाजाकडून खानविलकर कुटुंबाला आर्थिक मदत; तेली समाजाची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित

तेली समाजाकडून खानविलकर कुटुंबाला आर्थिक मदत; तेली समाजाची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित

*कोंकण एक्सप्रेस*

*तेली समाजाकडून खानविलकर कुटुंबाला आर्थिक मदत; तेली समाजाची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित*

*शिरगांव / संतोष साळसकर*

तेली समाजातील एकोप्याचे व सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण देत सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाने कणकवली तालुक्यातील निराधार खानविलकर कुटुंबाला तात्काळ आर्थिक व मानवी आधार देत समाजातील आपुलकीची परंपरा जपली आहे.कणकवली तालुक्यातील हळकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथील शरद खानविलकर व त्यांची पत्नी शारदा खानविलकर यांचे दुर्दैवी निधन झाल्याने त्यांच्या चार मुलांवर अनाथत्वाचे संकट ओढवले. या घटनेची बातमी दैनिक पुढारी मध्ये प्रसिद्ध होताच सिंधुदुर्ग तेली समाज तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावला.समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित खानविलकर कुटुंबाला भेट देऊन त्यांना मानसिक आधार दिला तसेच त्यांच्या रोजच्या गरजांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
शरद खानविलकर यांना दोन मुली व दोन मुलगे अशी चार मुले असून त्यापैकी तीन मुले शिक्षण घेत आहेत.त्यांना कोणताही आर्थिक आधार नसल्याची परिस्थिती लक्षात घेऊन तेली समाजाने जिल्हाभरातून सहकार्याचे आवाहन केले.समाजबांधवांच्या प्रतिसादातून एकूण १,५०,००० रुपये निधी जमा करण्यात आला आणि ही रक्कम मुलांच्या नावे बँकेत जमा करून त्याचे प्रमाणपत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले.या प्रसंगी तेली समाज मंडळाचे माजी अध्यक्ष एकनाथ तेली,उपाध्यक्ष परशुराम झगडे, उपाध्यक्ष निलेश कामतेकर, सचिव संजय कवटकर, शैलेंद्र डिचवलकर, साईनाथ चव्हाण, दया हिंदळेकर तसेच खानविलकर कुटुंबातील तन्वी, प्रथमेश व श्रीधर यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.यावेळी मुलांना त्यांच्या आवडीनुसार नवीन कपडे घेऊन देण्यात आले. तसेच या मुलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाज मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. याकामी जि.प. सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर ,कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचेही चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभत आहे.
संकटात धावून जाणे हीच खरी समाजसेवा असल्याचे उदाहरण देत सिंधुदुर्ग तेली समाजाने पुन्हा एकदा सामाजिक जबाबदारीची परंपरा जपली आहे. त्याचप्रमाणे या कुटुंबाला तेली समाजा व्यतिरिक्त समाज भान राखत उमेद फाउंडेशन मार्फत या कुटुंबाकरता जीवनाशक वस्तूकरिता आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात आले आहे तसेच या कुटुंबाला गावातील ग्रामस्थ ,समाज बांधव यांचेही सहकार्य लाभत आहे त्यांचे सर्वांचे आभार सिंधुदुर्ग तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!