*कोंकण एक्सप्रेस*
*शिवरायांच्या जयघोषाने कलमठ दुमदुमले*
*कणकवली ः संजना हळदिवे*
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान आणि शौर्याचे प्रतीक असलेले महाराष्टÑाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराने गुरुवारी शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीतर्फे काढलेल्या शिव रॅलीत छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने कलमठ-बाजारपेठ परिसर दुमदुमून गेला.
सर्वधर्मीय, सर्वजातीय नागरिकांचा सहभाग, हे या रॅलीचे खास वैशिष्ट्य ठरले. महिला शिवभक्तांचा सहभागही उत्स्फूर्त होता. शिवप्रेमींच्या भगवे झेंडे, भगव्या रंगाने सजविलेली वाहने, बालशिवाजीच्या वेशातील बच्चे कंपनी, शिवरायांच्या मावळ्यांचा पेहराव केलेले शिवभक्त, चारचाकीवरील आसनस्थ झालेले बालशिवाजी, महिलांनी पारंपरिक वेशभूषा अशा कित्येक बाबी लक्षणीय होत्या. देवगड तालुक्यातील नवश्या मारुती ढोलपथकाने रॅलीत रंगत आणली. या रॅलीत ग्रामस्थ व शिवप्रेमी सहभागी झाले होते. ही रॅली यशस्वी होण्यासाठी सुशांत राऊळ, पी. व्ही. कांबळे, नंदकुमार हजारे, सचिन पेडणेकर, नितीन पेडणेकर, धीरज मेस्त्री, नितीन उर्फ आबा मेस्त्री,अनुप वारंग, नितेश भोगले, प्रदीप सावंत, सिकंदर मेस्त्री, भूषण ठाकूर, सागर गावडे, सुंदर कोरगावकर, सुयोग कांबळी, अनिकेत कांबळी, निश्चय हुन्नरे, प्रसाद मठकर यांनी मेहनत घेतली.

