*कोंकण एक्सप्रेस*
*शिवप्रेमी मित्रमंडळाकडून श्री शिवाजी महाराजांना अभिवादन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे वेंगुर्ला शहरातील माणिकचौक येथील श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विनोद लोणे व सौ. फर्नांडिस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्रमंडळाचे प्रताप करंगुटकर, रोहित वेंगुर्लेकर, अनिल देसाई, दर्शन तानावडे, सुभाष अणसूरकर, भानू मांजरेकर, भाई वेंगुर्लेकर, संतोष वेंगुर्लेकर, श्री.गावडे, गुरूनाथ तुळसकर, प्रथमेश यंदे, विनय गोगटे, सचिन करंगुटकर, नितिश कुडतरकर आदी उपस्थित होते. शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे श्री शिवजयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून आज सायंकाळी 7 वाजता वेशभूषा स्पर्धा तसेच रांगोळी व किल्ले स्पर्धेचा बक्षिस वितरण तर 20 रोजी रेकॉर्ड डान् स्पर्धा आदींचा समावेश आहे.

