भाजपचे जेष्ठ नेते रमेश दळवी यांच्या निधनानंतर भाजप युवा नेते विशाल परब यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

भाजपचे जेष्ठ नेते रमेश दळवी यांच्या निधनानंतर भाजप युवा नेते विशाल परब यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपचे जेष्ठ नेते रमेश दळवी यांच्या निधनानंतर भाजप युवा नेते विशाल परब यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट*

*दोडामार्ग: शुभम गवस*

पक्ष नेते रमेश दळवी यांच्या निधनाने संपूर्ण तालुका शोकमग्न झाला असून त्यांनी निर्माण केलेली पोकळी आजही प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांच्या कार्याची, स्वभावातील आपुलकीची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण काढताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजप युवा नेते विशाल परब यांनी दळवी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ही भेट केवळ औपचारिक न राहता भावनिक संवादाने भरलेली होती. दळवी यांच्या कार्याचा, त्यांनी उभ्या केलेल्या संघटनात्मक बळाचा आणि तालुक्याच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारांचा यावेळी स्मरण करण्यात आले.
दळवी यांच्या जाण्यानंतर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तालुक्यातील सध्याची परिस्थिती, कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आणि पुढील काळातील नेतृत्व याबाबतही मनमोकळे विचारमंथन झाले.
या वेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दिपक गवस, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, पंचायत समिती सदस्य संजय साताडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, शहराध्यक्ष राजेश फुलारी, उपाध्यक्ष आनंद तळणकर, चेतन आजगावकर, शिरीष नाईक, समीर लोंढे, वैभव सुतार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रमेश दळवी यांनी घालून दिलेला मार्ग, त्यांची साधी जीवनशैली आणि समाजासाठीची तळमळ हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!