दोडामार्ग तालुक्यात भरपाल येथे श्री गिरोबा बाबा देवाचा नाट्यउत्सव २१ फेब्रुवारीला

दोडामार्ग तालुक्यात भरपाल येथे श्री गिरोबा बाबा देवाचा नाट्यउत्सव २१ फेब्रुवारीला

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग तालुक्यात भरपाल येथे श्री गिरोबा बाबा देवाचा नाट्यउत्सव २१ फेब्रुवारीला*

*दोडामार्ग : शुभम गवस*

नवसाला पावणारा, हाकेला धावणारा राखणदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री गिरोबा बाबा देवाचा नाट्यउत्सव शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी भरपाल येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री गिरोबा बाबा देवाचे दर्शन व तीर्थप्रसादाने होणार आहे. दुपारी ठीक १.०० ते ३.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ४.०० वाजता भरपाल ग्रामस्थांच्या सहभागातून भजन कार्यक्रम सादर होणार आहे.
रात्री ११.०० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुळ यांचा ट्रिक्स सीनयुक्त “एकपदा पृथ्वीककण” हा नावाजलेला नाट्यप्रयोग प्रथमच दोडामार्ग तालुक्यात सादर होणार असल्याने रसिकांसाठी ही विशेष पर्वणी ठरणार आहे.
या नाट्यउत्सवाला भरपाल वाडीतील तसेच बाहेरील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गिरीश राष्ट्रोळी युवक मंडळ, भरपाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!